Mumbai cha Maharaja | ‘मुंबईचा महाराजा’ची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुकमध्ये नोंद | पुढारी

Mumbai cha Maharaja | 'मुंबईचा महाराजा'ची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुकमध्ये नोंद

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ४३ फूट उंच मूर्ती असलेल्या ‘मुंबईचा महाराजा’ची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे. खेतवाडीचा लंबोदरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणेशाची मूर्ती ही महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेश मूर्ती ठरली आहे. (Mumbai cha Maharaja)

वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर एडिटर सुषमा नार्वेकर यांनी या गणेशोत्सव मंडळाला सर्टिफिकेट आणि मेडल देऊन त्यांना सन्मानित केले. ‘मुंबईचा महाराजा’ चा यंदा इंद्रदेवाच्या रूपात आहे. खेतवाडी ११ व्या गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ६२ वे आहे. केपी आर्ट्सच्या कुणाल पाटील यांनी ही मूर्ती साकारली आहे. (Mumbai cha Maharaja)

Back to top button