Maratha Reservation Protest : ‘मनोज जरांगे-पाटील उपोषण मागे घेतील; आम्हाला अपेक्षा…’- मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

Maratha Reservation Protest : 'मनोज जरांगे-पाटील उपोषण मागे घेतील; आम्हाला अपेक्षा...'- मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस मराठा आंदोलन चर्चेत आहे. जालना येथे आंदोलनास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी (दि.८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस उपस्थित राहिले. यासंदर्भात मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना म्हणाले की,” मनोज जरांगे पाटील यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळासोबत आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. हे शिष्टमंडळ मनोज जरंगे पाटील यांना या चर्चेसंबंधी माहिती देतील. आम्हाला अपेक्षा आहे की काहीतरी मार्ग निघेल आणि ते उपोषण मागे घेतील.” (Maratha Reservation Protest)

Maratha Reservation Protest : मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील बैठक

जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या मनोज जरांगे-पाटील यांची दिवसेंदिवस तब्येत खालावत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह इतर मंत्र्यांशी चर्चा केली. यासंदर्भात ‘CMO’ च्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत माहिती दिली आहे. जालना येथील आंदोलकांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक झाली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अर्जुन खोतकर, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित आहेत.

मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, दादाजी भुसे तसेच औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी देखील या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे (Video conference) सहभागी झाले होते.

हेही वाचा 

Back to top button