Maratha Reservation Protest : सिल्लोड आगारात शुकशुकाट…. | पुढारी

Maratha Reservation Protest : सिल्लोड आगारात शुकशुकाट....

सिल्लोड पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली – सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण दरम्यान पोलिसांकडून लाठीमार झाला. परिणामी चिघळलेल्या परिस्थितीमुळे विविध ठिकाणी निषेधार्थ आंदोलन व बंद पुकारले. त्यामुळे एसटी बस आगाराने नुकसान टाळण्यासाठी आज (दि.०३)  एसटी बससेवा बंद ठेवली आहे. (Maratha Reservation Protest )

सिल्लोड आगारात आज (दि.०३) एसटी बससेवा बंद असल्याने शुकशुकाट पसरलेली होती. विशेषतः रविवार हा सिल्लोड शहराचा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने प्रवाश्यांना मोठा त्रास सोसावा लागला. सिल्लोड येथील बस स्थानकाच्या दररोज १६६ बसेसच्या ३३२ फेऱ्यातुन जवळपास एका दिवसावंत २५ हजार किमी प्रवास एसटी बसचा होतो. त्यातून होणाऱ्या ६ ते ७ लाखांच्या उत्पन्नाचा आर्थिक फटका फेऱ्या बंद ठेवल्याने सिल्लोड आगाराला बसला आहे.

त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या ३६६ एसटी बसेसच्या ७३२ फेऱ्या देखील बंद असल्याने याप्रमाणे सिल्लोड आगाराशी निगडित १०६४ फेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. उद्या दि.४ सोमवार रोजी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने सिल्लोड शहरासह तालुक्यात बंद पुकारला गेलेला असल्याने याप्रमाणे सोमवारी इतकाच आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसणार आहे. आगार प्रमुख शंकर स्वामी यांनी दिली आहे.याप्रसंगी वाहतूक नियंत्रक शरद भिवसने, कैलास दुतोंडे, ब्रिजेश रॉय, गणेश नागरे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा 

Back to top button