Maratha Reservation Protest: जालना घटनेच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी संतप्त पडसाद

Maratha Reservation Protest: जालना घटनेच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी संतप्त पडसाद
Published on
Updated on

उत्तर सोलापूर, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.३) सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन, रास्ता रोको करण्यात आला. त्याचबरोबर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. (Maratha Reservation Protest)

सोलापूर – बार्शी रस्ता रोखला

उत्तर सोलापूर तालुक्यातील सोलापूर – बार्शी रस्त्यावर नान्नज वडाळा गावडी, दारफळ येथे सकल मराठा समाज व सर्व पक्षीयांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सुनील भोसले, सुशील गवळी, प्रमोद गवळी, नंदकुमार गवळी, प्रताप टेकाळे, दीपक अंधारे, हनुमंत टोणपे, संभाजी दडे, श्रीकांत मुळे, भारत बोंगे, विश्वजीत भोसले, प्रमोद कोरे, संजय मुळे, जगन्नाथ भोरे, शहाजी गोफणे उपस्थित होते. (Maratha Reservation Protest)

वडाळा – सोलापूर -बार्शी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

मराठा समाजाच्या वतीने वडाळा येथील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अमोल पाटील, अनिल माळी, तुषार साठे, मनोज साठे, जीवन साठे, सदान फंड, चिमण साठे, प्रवीण रिसवडकर, हिंदवी रिसवडकर, संपत गाडे, प्रभाकर गायकवाड, रवींद्र मोहिते, वडाळा परिसरातील अनेक कार्यकर्ते आंदोलनास उपस्थित होते.

Maratha Reservation Protest : गावडी दारफळ येथे रास्ता रोको

यावेळी दयानंद पवार, सचिन पवार, नागेश पवार, सुशांत काटमोरे- पाटील बार्शी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच भारत माळी, उपसरपंच नागेश पवार, कल्याण काळे, सुधाकर पवार, नानासाहेब पवार, परमेश्वर थिटे, किरण काळे, सचिन पवार, प्रदीप पवार, प्रवीण माळी, शुभम दळवे, श्याम माळी, अभिजीत माळी, संतोष गुंड, महेश कदम, केशव कदम उपस्थित होते.

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे आंदोलन

जालना घटनेच्या निषेधार्थ जेऊर येथे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजिर यांना निवेदन देण्यात आले.

Maratha Reservation Protest  : मोडनिंब येथे कडकडीत बंद

जालना घटनेच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे सकल मराठा समाज व सर्व पक्षीयांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

Maratha Reservation Protest : टेंभुर्णीत कडकडीत बंद पाळण्यात आला

यावेळी संजय पाटील-भिमानगरकर, सचिन जगताप, राहुल चव्हाण, सुरज देशमुख, प्रमोद कुटे, भाऊ महाडिक, अजित पाटील, सचिन पवार, शिवाजी पाटील, रामभाऊ शिंदे, संभाजी पाटील, प्रशांत पाटील, शिवाजी इंदुलकर, विठ्ठल मस्के, जयवंत पोळ, सुरेश लोंढे, परमेश्वर खरात, ॲड. तुकाराम राऊत, विशाल नवगिरे, महेंद्र वाकसे, प्रा.दीपक पाटील, दादासाहेब पिसाळ, राजू पाटील आदी उपस्थित होते. परिते ,आढेगाव येथे ही बंद पाळून घटनेचा निषेध करण्यात आला.

करमाळा  येथे रास्ता रोको

जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ करमाळा मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीने कमलादेवी बाह्यवळण रस्त्यावर एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. उस्फूर्तपणे 18 पगड जातीच्या युवकांनी एकत्र येत बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news