मुंबई : ई-लिलावातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत पावणे दोन कोटी | पुढारी

मुंबई : ई-लिलावातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत पावणे दोन कोटी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मध्य रेल्वे मार्गावरील तीन रेल्वे स्थानकांवर जाहिरात लावण्याच्या कंत्राटासाठी ई-लिलाव पार पडला. त्यात ठाणे,तळोजा पंचानंद आणि सायन या तीन स्थानकांवरील जाहिरातीच्या निविदा ऑनलाइन अंतिम करण्यात आल्या. त्यातून वर्षाला एक कोटी ७६लाख आणि येत्या ५ वर्षासाठी ९ कोटी ३७ लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेच्या तिजोरित गोळा झाले.यात सायन स्थानकाला सर्वाधिक १ कोटी २१ लाखांची बोली लागली.

ई-लिलाव हे भारतीय रेल्वेच्या कमाईच्या कराराच्या निविदांच्या खुल्या बोलीसाठी ऑनलाइन पोर्टल आहे. ज्याद्वारे विविध सहभागी कंत्राटदारांसाठी ऑनलाइन बोली लावण्यासाठी ३० मिनिटे ते एक तासाचा कालावधी लागतो. बिडिंगच्या शेवटी, ऑनलाइन टेंडर ताबडतोब सर्वाधिक बोली लावणाऱ्याला वाटप केले जाते. यशस्वी सर्वाधिक बोली लावणाऱ्याला त्याच दिवशी वाटप पत्र दिले जाते.पूर्वी निविदा अंतिम करण्यासाठी ३० ते ४५दिवस लागायचे. परंतु आता केवळ एका तासात ई-लिलाव पुर्ण होतो.यामुळे वेळेत देखील बचत होते.मुंबई विभागाने गुरुवारी तीन रेल्वे स्थानकांच्या जाहिरातीच्या कराराचा ई-लिलाव केला.त्यात निविदा ऑनलाइन अंतिम केल्या.

स्थानके कोणती(वर्षाला बोली)

सायन—-१कोटी २१ लाख

ठाणे ——३०लाख ३० हजार

तळोजा पंचानंद—–२५लाख ३० हजार

Back to top button