

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील सभागृहांमध्ये आणि मोकळ्या जागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी सांगितले.
मास्क, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ही त्रिसूत्री कायम ठेवून ही परवानगी देण्यात येत असून त्यासाठी कोरोनाच्या ठरलेल्या अटी घालण्यात आल्या आहेत. सभागृहात किंवा मैदानातील कार्यक्रमात प्रवेश देताना प्रेक्षकांचे तापमान तपासण्याची जबाबदारी सभागृहांची तथा आयोजकांची राहील.
लस घेतलेले प्रेक्षकच सांस्कृतिक कार्यक्रम सहभागी हाेवू शकतील. सभागृहाच्या बैठक क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेपेक्षा अधिक प्रेक्षक नसतील. व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये किमान 6 फूट अंतर असेल. बैठक व्यवस्थेतही सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.
हेही वाचा: