

राशिवडे : पुढारीवृतसेवा
येथील हनुमान तालीम कुस्ती संकुलच्या सात मल्लांची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. हे सर्व मल्ल राशिवडे गावचे असून एकाचवेळी सात मल्लांची पहिल्यांदाच निवड झाली आहे. कोल्हापूर येथील मोतीबाग तालीमीमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा चाचणी घेण्यात आली, यामध्ये या निवडी झाल्या. यामध्ये विविध सात गटातून राशिवडे गावातील सात मल्लांची निवड झाली.
सौरभ पाटील (६५किलो, गादी), कुलदिप पाटील (६५किलो, माती), किशोर पाटील (६५ किलो, माती), प्रतिक म्हेतर (७९ किलो, गादी), नितीन कांबळे (७० किलो, ग्रीको रोमन), सरदार पाटील (६१ किलो, माती), ओंकार लाड (६१ किलो, माती) या मल्लांना जिल्हा व शहर तालीम संघाचे बाळ गायकवाड, संभाजी वरुटे, प्रशिक्षक सागर चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.