BBM ३ : स्नेहाला वाचविण्यासाठी जय काय डावपेच आखणार? - पुढारी

BBM ३ : स्नेहाला वाचविण्यासाठी जय काय डावपेच आखणार?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (BBM ३ ) आज नॉमिनेशन कार्य रंगणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे की, सदस्यांची जीपमध्ये बसण्यासाठी धावपळ सुरू आहे. आणि जीपमध्ये बसलेले सदस्य गायत्री, उत्कर्ष, स्नेहा, जय आणि मीरा आहेत. जीपमधील सदस्यांनी बहुमताने निवडलेल्या एका सदस्याला जीपमधून उतरावे लागणार आहे. उत्कर्षचं म्हणण आहे की स्नेहाने खाली उतरावे.

परंतु, स्नेहाला नॉमिनेशनमधून वाचविण्यासाठी जय कोणता डावपेच आखणार? जयची साथ स्नेहाला मिळेल का? जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठीचा (BBM ३ ) आजचा भाग चाहत्यांना पाहावा लागणार आहे.

याचसोबत स्नेहा आणि आदिशमध्ये आज पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडणार आहे. आदिशची एंट्री झाल्यापासून तो प्रत्येक सदस्याशी हुज्जत घालताना दिसत आहे असे स्नेहाचे आणि इतर सदस्यांचे मत आहे. आदिशच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खळबळ उडाली आहे. सगळेच त्याच्याविषयी तर काही त्याच्याविरोधात बोलू लागले आहेत.

बिग बॉसने दिलेल्या कार्यामुळे आदिशबद्दल जय, उत्कर्ष आणि त्यांच्या गृपमध्ये नकारात्मक भावना वेळोवेळी दिसून आली आहे. आदिश आणि जयनंतर आता स्नेहा आणि आदिशमध्ये देखील वाद होणार आहे.

एका टास्कदरम्यान आदिश स्नेहाकडे चर्चा करायला जाणार आहे. त्या चर्चेचे रूपांतर भांडणामध्ये होणार आहे. आदिशला स्नेहाच्या संतापजनक प्रतिक्रियेचा सामना करावा लागणार आहे असं दिसत आहे. आदिशचं म्हणण आहे की ‘तुझं वैयक्तिकरित्या इरिटेशन असेल तर पण प्रतिक्रिया अशी माझा इन्फ्लुएन्स, मी जे बोलतो आहे ते देखील काऊंट होणार आहे.’

यावर स्नेहाचे म्हणणे आहे ‘तुमचं इन्फ्लुएन्स माझ्यासाठी काऊंट होतं नाही तुम्हाला असं वाटतं असेल मी तुमच्याकडे यावं प्रतिक्रिया मागायला तर तसं होणार नाहीये. मी काय विचारू’. यानंतर आदिशने देखील विचारले? त्यानंतर हा वाद वेगळाच दिशेला गेला. बघूया नक्की काय झालं ते आजच्या बिग बॉस मराठी सिझन तिसरा भागात पाहूयात.

तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button