बेबीकॉर्न : कोणते वाण लागवडीस योग्य आहे? | पुढारी

बेबीकॉर्न : कोणते वाण लागवडीस योग्य आहे?

कीर्ती कदम

बेबीकॉर्न यालाच बाल्य कणीक असेे म्हणतात. बेबीकॉर्न म्हणजे कणसातून स्त्रीकेसर (तुरा) बाहेर दिसताच काढलेले आवरणविरहित बाल्य कणीस होय. उत्तम प्रतीचे बेबीकॉर्न हे फिकट पिवळ्या रंगाचे असते. कणसावरील दाण्यांच्या ओळी एका रेषेत असतात. कणसाची लांबी 4.5 ते 10 सें.मी. असते आणि कणसाची जाडी सात ते दहा मि.मी. असते. चाचणी प्रयोगात माधुरी, मांजरी मिश्रण, एच एम-4 आणि व्ही. एल. 42 हे वाण योग्य असल्याचे आढळून आले आहेे.

बेबीकॉर्न याचा उपयोग प्रामुख्याने पंचतारांकित आणि मोठ्या हॉटेलमध्ये सॅलड, सूप, लोणची, भजी, वडे इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. यात मुख्यत: कर्बोदके, कॅल्शियम आणि स्फुरद या घटकांचे प्रमाण जास्त असल्याने ते इतर फळभाज्यांपेक्षा सरस आहे. आज अनेक कंपन्या बेबीकॉर्नपासून विविध खाद्यपदार्थांची विक्री करीत आहेत. अशा पदार्थांची बाजारातील मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

बेबीकॉर्नपासून लोणची, चटणी, मुरंबा असे पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरलेले आहेत. आधुनिक तंत्राने त्यावर प्रक्रिया करून हे पदार्थ अनेक दिवस टिकवण्याचे तंत्रही विकसित झाले आहे. यामुळे परदेेशातसुद्धा बेबीकॉर्नपासून निर्मित खाद्यपदार्थ निर्यात करण्याच्या संंधी वाढल्या आहेत. बेबीकॉर्न हे पौष्टिकतेच्या द‍ृष्टीने इतर भाज्यांच्या तुलनेत सरस आहे. कारण, यात व्हिटॅमिनची मात्रा भरपूर असून लोह आणि फॉस्फरससुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. पुरेशा प्रथिनांची मात्रा असल्यामुळे हे पचनास हलके असते. विशेेष म्हणजे कीटकनाशकांची फवारणी झाल्यावर कीटकनाशकांचे अंश बेबीकॉर्नच्या वनस्पतीत शोषले जात नाहीत, या कारणानेसुद्धा बेबीकॉर्नचे विशेेष महत्त्व आहे.

Back to top button