मुंबई : नागपाड्यामध्ये पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार | पुढारी

मुंबई : नागपाड्यामध्ये पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  नागपाड्यामध्ये एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीला नायर रुग्णालयात उपचार सुरु असून नागपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली. नागपाड्यातील मोरलँड रोड परिसरात शनिवारी ही घटना घडली.

पीडित मुलीच्या ३१ वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीवरुन नागपाडा पोलिसांनी बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्ह्याचा जलद गतीने तपास करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी पाच पथके तयार केली. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली. फुटेजच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत आरोपी मुलाचे काही जवळचे नातेवाईक मुंबई आणि आसपासच्या परिसरात रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वांद्रे, जुहू आणि जोगेश्वरी झोपडपट्टीत परिसरात पथके पाठवून आरोपीच्या नातेवाईकांकडे चौकशी करत शोध सुरु ठेवला. आरोपी हा नालासोपारा येथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने रविवारी पहाटे नालासोपारा येथे जात आरोपीला ताब्यात कामानिमित्त घेतले. आरोपी हा नागपाड्यात येत असताना त्याची वाईट नजर चिमुकलीवर पडली होती.

Back to top button