मुंबई; पुढारी ऑनलाईन : MPSC भरती प्रक्रिया या वर्षी होणार की नाही? अशी शंका असणाऱ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एमपीएससीची जाहिरात पुढील वर्षी निघेल, अशा चर्चा होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी MPSC भरतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
एमपीएससी रिक्त पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत विविध विभागातील किती पदे भरायचे आहेत, याविषयी माहिती द्यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी त्या-त्या विभागाला दिले आहेत.
याबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, भरती प्रक्रियेबात एमपीएससीच्या सचिवांशी चर्चा झाली. त्यावेळी रिक्त पदांची माहिती मिळालीय. ज्या काही याद्या असतील ती पदे आम्ही भरू. त्यानुसार जाहिरीती निघतील. रिक्त पदांची माहिती देण्याचे सर्व विभागांना मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत सर्व रिक्त पदांची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सैनिक भरतीत युवक-युवतींना स्थान मिळेल, असेही ते म्हणाले.
मनपा निवडणुकीसीठी त्रिसदस्यीय प्रभाग पध्दतीचा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणत केंद्राची नेमकी भूमिका आता समोर आलीये.
इम्पेरिअल डाटा देण्यास केंद्राचा नकार आहे. सुप्रीम कोर्टासमोर भूमिका स्पष्ट झाली आहे. आतापर्यंत उगाचचं राज्य सरकारच्या बदनामीचं षड्यंत्र सुरू होतं. असे म्हणत अजित पवार यांनी भाजपला टोला लगावला.
राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्थांची ईडी चौकशी लावणार या दरेकरांच्या इशाऱ्यावर पवारांनी प्रतिक्रिया दिली. मुंबै बँकेच्या नोटीशीच्या इशाऱ्यावर पवार म्हणाले, कुणाला जर वाटत असेल तर तक्रार करावी. तर त्यांनी ती करावी. त्यात तथ्य असेल तर तपासणी होईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 15 हजार 511 पदांची भरती अखेर जाहीर झाली आहे. राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरती प्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.
ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विविध खात्यांतील रिक्त पदांची माहिती तत्काळ संकलित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. या भरतीची घोषणा त्यांनी विधिमंडळ अधिवेशनातच केली होती. त्यानुसार गट अ, गट ब व गट क श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली आणि 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली.
दरम्यान, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० ची तारीख जाहीर जाहीर करण्यात आली आहे. येत्या चार डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाईल. याबाबत आयोगाकडून परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
आयोगाने परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर, २०२१ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येणार आहे. तसेच, अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावे, अशी माहिती देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२०, दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.