बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन : साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन : साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क :  साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात… असं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ( Balasaheb Thackeray) दहावा स्मृतीदिन. (बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन)

आज शिवसेनाप्रमुख, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज स्मृतीदिन. यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत आदरांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केले आहे की, “साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात… वंदनीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.

बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन : शिवसेना-भाजप युती

काल (दि.१६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला दादर येथील स्मृतिस्थळावर उपस्थित राहून अभिवादन केले. त्यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात चार महिन्यांपूर्वी राज्यात त्यांना अभिप्रेत असलेले शिवसेना-भाजप युती सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यातील गरीब, शेतकरी, कष्टकरी जनतेला न्याय देता येईल, असे अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन जनतेच्या मनातील शिवशाही अस्तित्वात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

हेही वाचा

Back to top button