‘स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारका’च्या कामाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी | पुढारी

'स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारका'च्या कामाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘स्व.बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारका’च्या कामाची पाहणी बुधवारी (दि.१६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्मारक जनतेला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यावेळी दिली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दादर येथील महापौर बंगला परिसरात सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी आढावा बैठकही घेतली. बैठकीस मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, माजी मंत्री रामदास कदम, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button