अफझल खान वध देखव्यात कृष्णा भास्कर कुलकर्णी वधाचा पुतळा देखील दाखविण्यात यावा : संभाजी ब्रिगेड | पुढारी

अफझल खान वध देखव्यात कृष्णा भास्कर कुलकर्णी वधाचा पुतळा देखील दाखविण्यात यावा : संभाजी ब्रिगेड

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वर्ष २०२४ च्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने प्रतापगडावर अफझल खान वधाच्या देखाव्याचा पुतळा उभारण्याचे आदेश दिले आहेत. या निमित्ताने मंगलप्रभात लोढा यांचे आम्ही समस्त संभाजी ब्रिगेड मार्फत मनपूर्वक आभार मानत आहोत. छत्रपती शिवरायांचा स्वराज्यासाठी दैदिप्यमान लढा आणि रोमहर्षक विजय या निमित्ताने संपूर्ण जगाला दाखविता येईल.

परंतु, या अफझल खान वधाच्या क्षणी अफझल खानाचा वकील स्वराज्याचा गद्दार कृष्णा भास्कर कुलकर्णी याने छत्रपती शिवरायांवर तलवारीने घाव केला होता. ही जखम शिवरायांच्या मस्तकावर शेवट पर्यंत राहिली होती, त्या वेळेस छत्रपती शिवरायांनी चपळाईने दुसरा घाव वाचवत गद्दार कृष्णा भास्कर कुलकर्णी याचे मुंडके छाटले होते. हा खरा इतिहास व क्षण सुध्दा या देखाव्यात तसेच चित्रफितीत दाखविण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड मुंबईचे प्रदेश प्रवक्ते प्रमोद शिंदे यांनी केली आहे. याबद्दल सविस्तर पत्र पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button