दोन लाखांची लाच घेताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

दोन लाखांची लाच घेताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

नवी मुंबई, पुढारी वृतसेवा : २ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अलिबागच्या तहसिलदारास आणि त्याच्या एजंटला एसीबीने अटक केली आहे. मिनल कृष्णा दळवी असे अटक करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. तर त्याचा एजंट राकेश रमाकांत चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबई एसीबीची डीवायएसपी ज्योती देशमुख यांनी केली. एसीबीच्या या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, अलिबागचे तहसीलदार मिनल दळवी यांनी तक्रारदार महिलेकडे बक्षीसपत्र मिळालेली जमीन सास-यांच्या नावे नोंद होण्यासाठी एजंट मार्फत पाच लाख रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन लाख रूपये देण्याचे निश्चित झाले. याबाबत तक्रारदार महिलेने नवी मुंबई लाचलुचपत विभागात तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २९ सप्टेंबर २०२२ रोजी लाचेच्या मागणीची सत्यता पडताळून पाहण्याच्या कारवाईला सुरूवात झाली.

दरम्यान एजंट राकेश चव्हाण याने स्वतःसाठी आणि तहसीलदारांसाठी तीन लाख रूपयांची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आज पुन्हा तहसीलदार यांनी सदर कामासाठी दोन लाख रूपये एजंटकडे देण्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर शुकवारी (दि.११)अलिबाग नगरपालिका समोरील आर.के. इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये तक्रारदार महिलेकडून एजंट राकेश चव्हाण याला दोन लाख रूपये घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

हेही वाचलंत का?

Back to top button