मुंबई : आवक घटल्याने भाजीपाला महागला ­­­ | पुढारी

मुंबई : आवक घटल्याने भाजीपाला महागला ­­­

नवी मुंबई;  राजेंद्र पाटील :  राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याची आवक 35 टक्क्यांनी घटल्याने त्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशीच स्थिती दिवाळीपर्यंत ही तेजी कायम राहणार असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार्‍यांनी
दिली. किरकोळ बाजारात आजही भाजीपाला 120 रुपये किलोने विकला जातो. तर फळ बाजारपेठेत होणारी आवक ही नियमित असली
तरी फळांचे दर चढेच असून दिवाळीत आणखी 20 टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे.

शेतमालाचे उत्पादन घेणार्‍या जिल्ह्यांमध्ये पावसाने 15 दिवसांत काही प्रमाणात उघडीप दिली. मात्र परतीच्या पावसाने पुन्हा झोडपल्याने
भाजीपाला मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांच्या बांधावरच सडू लागला आहे. त्यामध्ये पालेभाज्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
सध्या केवळ 50 ते 55 ट ?े आवक सुरु आहे. आवकेची वाहने 600 ते 625 असली तरी त्यामध्ये पिकअप सारख्या वाहनांचा सर्वाधिक
आहे. म्हणजे ही आवक तशी पाहिली तरी केवळ 350 ते 400 वाहनांची होते. गेल्या आठवड्यात कोथिंबीर जुडीचे दर 60 ते 80 रुपये तर मेथी 40 ते 50 रुपये जुडीने विकली जात होती. सर्वच भाज्या 100 ते 120 रुपये तर वाटाणा 200 रुपये किलो विक्री केला जात आहे. कोथिंबिरचे दर घाऊक बाजारात कमी उतरले असले तरी किरकोळला मात्र तेजी आज ही कायम आहे.

याबाबत घाऊक व्यापारी शंकर पिंगळे यांना विचारले असता, ते म्हणाले सर्वच भाज्यांचे दर एपीएमसीत 25 ते 35 रुपये किलो असून किरकोळ बाजारात मात्र तेजी आहे. ही तेजी दिवाळीपर्यंत कायम राहिल. 10 नोव्हेंबरनंतर आवक वाढण्यास सुरुवात होईल.
सध्या नाशिक, पुणे, सातारा आणि परराज्यातून 15 टक्के भाजीपाल्याची आवक सुरु आहे. तर घाऊक फळ व्यापारी संजय पानसरे यांच्या म्हणण्यानुसार फळ बाजारात 225 ते 250 गाड्यांची आवक आहे. दिवाळीपर्यंत बाजार तेजीत असेल. दिवाळीत फळांचे दर आणखी 20 टक्क्यांनी वाढतील. सध्या सफरचंदाची आवक काश्मिर, शिमला येथुन होते. सफरचंद घाऊक बाजारात 80 ते 100 रुपये किलो दर असून दररोज 30 गाड्यांची आवक आहे.

सिताफळाची पुरंदर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतून 10 गाडी आवक आहे. 200 रुपये किलोने सिताफळाची घाऊकला विक्री होत आहे. पपई, कलिंगड हे महाराष्ट ?ाबरोबरच आणि कर्नाटक राज्यातून येतात. त्याची विक्री 10 ते 12 रुपये किलोने होते. तर मोसंबीची औरंगाबाद येथून 30 गाड्यांची आवक सुरु असून तिला किलोमागे 35 ते 40 रुपये दर मिळतो. किरकोळ बाजारात हेच दर
30 ते 35 टक्क्यांनी वाढलेले आहेत.

 

Back to top button