मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, निकामी करण्यासाठी केली ५ कोटींची मागणी | पुढारी

मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, निकामी करण्यासाठी केली ५ कोटींची मागणी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगितले आणि ते बॉम्ब निकामी करण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केली. या प्रकरणी आयपीसीच्या ३३६, ५०७ अन्वये सहार पोलिस स्थानकात गुन्हा करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

या आधी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना फोनवरुन धमकी देण्यात आली होती. त्यांना धमकीचे तीन- चार कॉल्स आले होते. पुढील तीन तासांत मोठी घटना घडेल, असा दावा कॉल करणाऱ्याने केला होता. रिलायन्स फाउंडेशनच्या हरकिशनदास रुग्णालयातील नंबरवर धमकीचे फोन आले होते.

Back to top button