राधानगरी धरण पाणीसाठा ९३ टक्क्यांवर

file photo
file photo
Published on
Updated on

‌राधानगरी : पुढारी वृत्तसेवा : ‌राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. दरम्यान राधानगरी धरण ९३ टक्के भरले आहे.

मागच्या चोवीस तासात १५९ मिमी पाऊस झाला आहे. जूनपासून आजअखेर २६०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

धरणातून वीजनिर्मितीसाठी १४०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे.

पावसाचा जोर वाढल्यास आज दुपारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

धरणात ७८१०.१९ द.ल.घ.फु. इतका पाणीसाठा असून पाणी पातळी ३४४.८२ फूट इतकी झाली आहे.

दरम्यान शनिवारी सकाळी सहा वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी ५६ फूट होती. सकाळी सात वाजता हीच पाणीपातळी ५५. १० फुटांवर आली आहे.

सकाळपासून पाऊस पूर्णपणे थांबला असून सूर्यदर्शन झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या माऱ्याने हैराण झालेले कोल्हापूरकर थोडसे सुखावले आहेत.

Gokul milk कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे जिल्ह्यातील सर्व मार्ग बंद झाले आहेत. यामुळे गोकुळ दुध संघाला याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील बहुतेक गावांचा संपर्क तुटल्याने Gokul milk संघाची वाहने अडकून पडल्याने लाखो लिटर दुधाचा पुरवठा ठप्प झाला आहे.

मागील दोन दिवसांत अनेक मार्गावरील दूध संकलनाची वाहने जाऊ शकली नाहीत. त्यामुळे दोन दिवसांत २ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक दूध संकलन होऊ शकले नाही.

दि. २३ रोजी राधानगरी धरण परिसरात झालेला पाऊस

धरण माथा पातळी- (TBL)– ३५२ फूट

पूर पातळी- (MWL) — ३४८.४३ फूट

पूर्ण संचय पातळी-( FSL)– ३४७.५०फूट

प्रकल्पीय एकूण पाणी साठा–८३६२.१६दलघफू (८.३६ टी.एम.सी.)

उपयुक्त पाणी साठा–७७६८.१६ दलघफू (७.७७ टी.एम.सी.)

मृत पाणी साठा —५९४ दलघफू (०.५९ टी.एम.सी.)

आजची स्थिती (सकाळी ६.००)

दैनिक पाऊस–५६७ मिमी

‌एकूण पाऊस–२४४४ मिमी

पाणी पातळी –३४१.३० फूट

पाणी साठा–७२२२.०६ दलघफू

(७.२२ टि.एम.सी.) ८६टक्के

विसर्ग

१) बी.ओ.टी.पॉवर हाऊस–१४००क्युसेक्स

एकूण विसर्ग——–१४०० क्युसेक्स

राजाराम बंधारा पाणी पातळी

दि 24/07/2021

सकाळी 09.00 वाजता

राजाराम बंधारा पाणी पातळी
55'7"
547.13 meter
विसर्ग 75352 cusecs आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी – 39 फूट व धोका पातळी – 43 फूट आहे)
एकुण पाण्याखालील बंधारे -: 108

हे ही पाहा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news