

गारगोटी ; पुढारी वृत्तसेवा : भुदरगड : गोवा राज्यातून नाशिककडे जात असलेली खासगी ट्रॅव्हल्स पिंपळगाव मार्गावर पांगीरे येथे ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेली. सुदैवाने चालकासह ११ प्रवाशी बचावले. दरम्यान भुदरगड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. गारगोटी परिसरात गुरूवारी सकाळपासूनच पांगिरे ओढ्यावर पुराचे पाणी आले होते.
पिंपळगाव मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.
ओढ्याच्या दोन्ही बाजुला अडथळे लावून प्रवेश बंद केला होता.
रात्री २. ३० वा. सुमारास गोवा येथून नाशिक येथे हॉटेल कामासाठी नेपाळी कामगार घेऊन जाणाऱ्या खासगी बस चालकाने बस गारगोटी जवळच्या ओढ्याच्या पाण्यात घातली.
चालकाला हा पाण्याचा अंदाज न आल्याने बस पाण्यातून वाहून जाऊ लागली.
यावेळी बसमधील प्रवाशांनी आरडाओरड केल्याने जवळच्या पांगिरे गावातील ग्रामस्थ मदतीला धावले.
ग्रामस्थांनी गावात उभा असलेला कंटेनर पाण्यामध्ये घेऊन दोरीच्या सहाय्याने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
या सर्व कामगारांना येथील दत्त मंदिरात ठेवले आहे.
हे ही पाहा