नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : राज्यात मुसळधार पावसामुळे राज्य महामार्ग वर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन आणि आयआरबी बरोबर सतत समन्वय साधण्याचे आदेश महामार्गाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्य यांनी दिले आहेत. यामुळे राज्यातील ६३ महामार्ग केंद्रावर कार्यरत असलेले पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.
मुसळधार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्ग पुर्ण बंद करण्यात आला आहे. कल्याण मुरबाड मार्ग बंद केला आहे. कोकणातील सर्वच मार्ग बंद झाल्याची माहिती महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षेने दिली.
तर मध्य रेल्वे मार्गावर कसारा घाटात दरड कोसळल्याने रेल्वे मार्ग बंद आहे. यामुळे लांब पल्ल्याचे मेल, एक्स्प्रेस इगतपुरी, नाशिक, देवळली, लासलगाव, मनमाड पर्यंत रेल्वे मार्गावर तर काही गाड्या स्थानकात थांबविण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक प्रवाशांनी महामार्गाने प्रवास करण्यास सुरूवात केली आहे.
यावेळी महामार्गावर कुठेही वाहतुकीला अडथळा किंवा कोंडी होऊ नये, याची खबरदारी महामार्ग पोलिसांनी घेतली आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी राज्यातील ६३ महामार्ग टॅपच्या (केंद्र) प्रभारी अधिका-यांशी सतत मुंबईं मुख्यालयातील नियंत्रण कक्षेतून संपर्क साधला जात आहे.
सर्व अधिकार, कर्मचाऱ्यांनी महामार्गावर उपस्थित राहून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आयआरबी आणि जिल्हा पोलीस प्रशासनांशी समन्वय साधावा. असे असे निर्देश महामार्गाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्य यांनी दिले आहेत.
मुंबई गोवा आणि मुंबई कोल्हापूर, आग्रा महामार्गावर अधिक सर्तक राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथील वाहतुकीची तासातासाला माहिती घेण्याचे आदेश नियंत्रण कक्षेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हे ही वाचा :