मोदी, शहा महाविकास आघाडी सरकार पाडण्यास प्रयत्नशील | पुढारी

मोदी, शहा महाविकास आघाडी सरकार पाडण्यास प्रयत्नशील

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन :मोदी व शहा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी ऐवजी तेथे भाजपचे सरकार स्थापन करण्यास ते उत्सुक आहेत, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

अधिक वाचा:

खरगे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या जोडगोळीने पेगाससद्वारे हेरगिरी करून कर्नाटकातील जनता दल सेक्युलर व काँग्रेस आघाडीचे सरकार पेगाससद्वारे हेरगिरी करून पाडले.

त्यानंतर मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांचे काँग्रेस सरकार पाडून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. आता या दोघांनी महाराष्ट्राकडे मोर्चा वळविला आहे.’

अधिक वाचा

मोदी व शहा पेगाससची मदत आता घेतात का, याबाबतही मला कल्पना नाही. मात्र कर्नाटक, मध्य प्रदेशात जे घडले, तो महाराष्ट्रासाठी इशारा आहे.

अधिक वाचा

महाराष्ट्रातील भाजपचे नेते व घटनात्मक पदांवर विराजमान असलेल्या लोकांच्या सध्याच्या एकूण कृती पाहिल्या आणि हालचाली पाहिल्या तर भाजपचे इरादे चांगले नाहीत असे दिसते.

वेगळे लढलो तरी गंभीर होऊ नका

सध्या आम्ही स्वबळावर लढण्याचे नारे देत आहोत. मात्र, गेली १५ वर्षे आम्ही सत्तेत असतानाही अनेकदा एकमेकांच्या विरोधात लढलो आहोत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आम्ही विरोधात लढत होतो.

मंत्रिमंडळ बैठकीत आपण एकत्र निर्णय घ्यायचो आणि स्थानिक निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध प्रचार करायचो.

आत्ताही तेच करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही समजावून सांगू, असेही ते म्हणाले.

हेही वाचलेत का: 

Back to top button