वाळवा तालुक्यात मुसळधार : वारणा नदी पात्राबाहेर | पुढारी

वाळवा तालुक्यात मुसळधार : वारणा नदी पात्राबाहेर

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासूनही पावसाची संततधार सुरु होती. वारणा नदीचे पाणी पात्राभाहेर पडले.

अधिक वाचा 

कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा एेतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे काोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.

चिकुर्डे येथील बंधारा तसेच कृष्णा नदीवरील बहे व बोरगाव येथील बंधारेही पाण्याखाली गेले आहेत.

अधिक वाचा 

पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णा – वारणा नदीकाठावर पूर परस्थीती उदभावु शकते. त्यामुळे संभ‍ाव्य पुरपरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरु आहे. बुधवारपासून पावसाचा जोर वाढत गेला. बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस सुरु होता. पावसाचा जोर वाढत असल्याने पाझर तलावातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.

पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाने व आोढे – अोघळी वाहू लागल्याने कृष्णा – वारणा नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ  : गायी पाळणाऱ्या मुंग्यांची गोष्ट

 

Back to top button