औरंगाबाद : दामले प्रकरण; पीडितेने घेतले विष

file photo
file photo
Published on
Updated on

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : येथील दामले प्रकरण गाजलेले आहे. दामले प्रकरण मधील भाजपचे शहर सचिव अशोक दामले यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, पुंडलिकनगर पोलिसांनी रात्रीतून एफआयआरमधील विनयभंगाचे कलम (३५४, अजामीनपात्र) कमी केले.

त्याऐवजी ५०९, ५०२ (जामीनपात्र) कलम लावले होते. यामुळे तणावात येऊन पीडितेने शुक्रवारी सकाळी विषारी द्रव प्राशन केले. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

अधिक वाचा- 

अशोक दामले आणि त्यांच्या पत्नीने चार दिवसांपूर्वी २९ वर्षीय पीडितेला रॉडने मारहाण केली होती. या प्रकरणात दामले दांपत्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

पीडितेला एफआयआर क्रमांक ०३४५/२१ ची प्रत देण्यात आली

अधिक वाचा- 

दरम्यान, अशोक दामले यांनी हनुमाननगरात सह्यांची मोहीम राबवून पीडितेविषयी अपशब्द लिहून निवेदन तयार केले. त्यावर गल्लीतील २८ नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या. यात पीडितेबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते.

यामुळे पीडितेला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यावरुन पीडितेने दामलेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. या प्रकरणात ३१ ऑगस्ट रोजी अचानक शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी उडी घेतली.

अधिक वाचा-

त्यांनी पुंडलिकनगर ठाण्यासमोर गर्दी करुन घोषणाबाजी करीत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हा प्रकार समजल्यानंतर तेथे भाजपा महिला कार्यकर्त्या जमा झाल्या.

त्यांनीही दबावतंत्राचा आरोप करीत विनयभंगाचा गुन्हा दाखल करु नये, अशी मागणी केली. दुपारी चार वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना शांत केले होते.

पीडितेला एफआयआरची प्रत देण्यात आली

दरम्यान, या प्रकरणात ३१ ॲगस्ट रोजी दुपारी दीड वाजता भादंवी कलम ३५४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी ४ वाजून ८ मिनिटांनी पीडितेला एफआयआर क्रमांक ०३४५/२१ ची प्रत देण्यात आली होती.

त्यानंतर त्याच रात्री पोलिस निरीक्षक गांगुर्डे यांनी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना माहिती सादर केले. याबाबत पत्रव्यवहार केला. त्यात त्यांनी एफआयआर क्रमांक. ३४५/२०२१ चे कलम ५०४, ५०६, ५०९ आणि ५०२ भादंवी प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे, असा उल्लेख केलेला आहे.

विशेष म्हणजे, ही माहिती फिर्यादीला १ सप्टेंबर रोजी पोलिस उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी ठाण्यात बोलावून दिली.

यात रात्रीतून नेमके काय झाले? पोलिसांना थेट एफआयआरमध्ये फेरफार का करावा लागला, हे कोडे कायम आहे. हा प्रकार पीडितेला समजताच तिने न्यायची मागणी केली.

अजामीनपात्र कलम हटवून जामीनपात्र कलम लावले. ३ दिवसांपासून दामले यांना अटकही करण्यात आली नव्हती. त्यामुळे पीडितेने विष प्राशन केल्याची चर्चा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news