बालिका वधू मालिकेत लीड रोड करणाऱ्या तीन कलाकरांचा अकाली अंत!

बालिका वधु मालिकेत काम करणाऱ्या आतापर्यंत तीन कलाकरांचा अकाली मृत्यू झाला आहे.
बालिका वधु मालिकेत काम करणाऱ्या आतापर्यंत तीन कलाकरांचा अकाली मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: 'बिग बॉस १३' चा विजेता आणि टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे आज हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील कूपर रुग्णालयात मूत्यू झाला.

सिद्धार्थ शुक्लाने आपल्या अभिनयाची छाप टीव्ही शो आणि अनेक बॉलिवूड चित्रपटात दाखविली. 'बालिका वधू' या टीव्ही सीरियलमधून तो चाहत्यांच्या घराघरात पोहोचला. परंतु, 'बालिका वधू' या मालिकेतील सिद्धार्थसोबत आणखी दोन स्टार्संचादेखील मूत्यू झाला आहे.

वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता सिद्धार्थने रात्री झोपण्यापूर्वी काहीतरी औषधे घेतली होती. परंतु, तो त्यानंतर उठला नाही.

यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी सिद्धार्थचा मृत्यू हार्ट ॲटॅकने झाल्याचे घोषित केले. सिद्धार्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे सांगितले आहे.

सिद्धार्थने 'बालिका वधू', 'दिल से दिल तक' मालिका, 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपट आणि 'ब्रोकन बट ब्युटिफुल' या वेब सीरीजमध्ये काम केलं होतं. 'बालिका वधू' या मालिकेतून सिद्धार्थ चाहत्यांच्या घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने 'आयएएस अधिकारी शिवराज शेखरची भूमिका साकारली होती, शिवच्या भूमिकेने चाहत्यांना भारावून सोडले होते.

प्रत्युषा बॅनर्जीने केली आत्महत्या

'बालिका वधू' या मालिकेत सिद्धार्थसोबत त्याच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने 'आनंदी' नावाची भूमिका साकारली होती. परंतु, सिद्धार्थच्या आधी प्रत्युषा बॅनर्जीचा वयाच्या २५ व्या वर्षीच गळफास घेवून आत्महत्या केली होती.

प्रत्युषाच्या निधनाचे कारण अजुनही गुलदस्तातच आहे. याच दरम्यान तिने कौटुंबिक समस्यांमुळे हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात होते. प्रत्युषाही सिद्धार्थसोबत 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाली होती.

'बालिका वधू' या मालिकेत सिद्धार्थ, प्रत्युषासोबत आणखी एका दिग्गज अभिनेत्रींचे निधन झाले आहे. या मालिकेतील दादीसा म्हणजे, अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचेदेखील १६ जुलै २०२१ रोजी मुंबईत निधन झाले आहे.

'बालिका वधू' या मालिकेत सध्या तिन्ही स्टार्सचे निधन झाल्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news