संसदेत घुसखोरी : लातूरमधील ‘त्या’ तरुणाचे नोकरी नसल्याच्या नैराश्यातून कृत्य? घरची परिस्थिती हालाखीची | पुढारी

संसदेत घुसखोरी : लातूरमधील 'त्या' तरुणाचे नोकरी नसल्याच्या नैराश्यातून कृत्य? घरची परिस्थिती हालाखीची

लातूर, चाकूर, पुढारी वृत्तसेवा : संसदेमध्ये घुसखोरी केलेला अमोल धनराज शिंदे हा लातूर जिल्ह्यातील झरी (बु.) येथील रहिवासी आहे. त्यांने हे कृत्य नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून केल्याची चर्चा आहे. तथापि यामागचे खरे कारण पोलिसांच्या तपासातूनच उघड होणार आहे. त्या दिशेने तपास सुरू झाला आहे. अधिक माहिती काढण्यासाठी अमोल शिंदे याच्या घरी पोलिस पथक पोहोचले आहे.
२२ वर्षापूर्वी आजच्या दिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या घुसखोरीमागे नेमका काही घातपाताचा प्रकार आहे का ? याचाही तपास सुरू झाला असून एटीएसचे पथकही अमोलच्या घरी दाखल झाले आहे. Amol Shinde

आज संसदेत प्रेक्षक गॅलरीत उड्या मारुन स्मोक कँडल फोडणाऱ्या पैकी अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील असल्याचे समजात प्रशासन सतर्क झाले व पोलिसांनी तत्काळ शोध सुरू केला. तो चाकूर तालुक्यातील झरी (बु.) येथील रहिवाशी असल्याचे कळताच पोलिस तिथे पोहचले. अमोल शिंदे याचे वडील गावच्या खंडोबा मंदिरात झाडलोट करतात. तर आई मजुरी करते. अमोलला दोन भाऊ असून एक मंदिराच्या शिखराचे काम करतो. तर दुसरा फरशी फिटिंगचे काम करतो. अमोलचे शिक्षण बीए पर्यंत झाले आहे. त्यांने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवले आहे. Amol Shinde

सध्या तो सैनिक भरतीसाठी सराव करीत आहे. चार दिवसांपूर्वीच तो मिल्ट्री भरती सरावासाठी दिल्लीला गेला होता. दरम्यान त्याच्या घरी दहतशवाद विरोधी पथक दाखल झाले आहे. अमोलसंबंधी त्याच्या घरातील कागदपत्रांची त्यांनी पडताळणी सुरू केली आहे. त्याच्या आई-वडिलांचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान त्याच्या घरासमोर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत पोलिस महासंचालकांशी फोनवर संवाद झाला असून लातूर पोलिसांनी तपास गतिमान केला आहे.

हेही वाचा 

Back to top button