

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : सामान्य लोकांसाठी केलेले आंदोलन, तुम्हाला स्टंट वाटत असेल, तर तुम्हाला सामान्य लोकांबद्दल काही वाटत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जे विधान समोर आले आहे. ते आश्चर्यकारक आहे. खरेतर युवकांना मदत करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. युवांना संधी देण्याची जबाबदारी सरकारची आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिली. Rohit Pawar
फक्त शिंदे गटाचे नाही, तर अजित पवार गटाच्या मित्र मंडळांना देखील भाजप चिन्हावर लढावे लागेल असा दावाही आमदार पवार यांनी केला आहे. माझ्यावर लाठीहल्ला झाला असे मी कुठेही बोललो नाही. यावेळी माझे देखील कपडे तिथे फाटले होते. एखाद्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला, तर तो नेत्यावरही होतो, असे ते म्हणाले. Rohit Pawar
अमोल मिटकरींना एवढं महत्व का देता? त्यांचा पराक्रम काय तो लवकरच कळेल? भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर छेडले असता त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. तुम्ही गद्दारी का केली? शिवाजी महाराज सुरतला जाऊन सामान्य लोकांना लुटत नव्हते. पण तुम्ही सामान्य लोकांना विचाराने लुटले. भाजपचे नेते महाराष्ट्राला देखील हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत, असा आरोप पवार यांनी यावेळी केला.
हेही वाचा