काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे यांचा शिवसेना उबाठात प्रवेश; जालन्यातून निवडणूक लढविण्याची शक्यता | पुढारी

काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे यांचा शिवसेना उबाठात प्रवेश; जालन्यातून निवडणूक लढविण्याची शक्यता

छत्रपती संभाजी नगर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी शुक्रवारी (दि. १५) रोजी आपल्या समर्थकांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय लाखे यांना शिवबंधन बांधले.

संबंधित बातम्या 

यावेळी पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संघटक चेतन कांबळे यांनीही प्रमुख उपस्थिती होती. लाखे हे जालन्यातून शिवसेना उबाठाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना उबाठा गटाने छत्रपती संभाजीनगरसोबत जवळ असलेल्या जालना मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे. ही जागा उबाठा गटाकडे जाण्याची दाट शक्यताही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला.

.. अन उद्धव ठाकरे म्हणाले, आपण संभाजीनगर वरील दावा सोडला

काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखे यांना शिवबंधन बांधले. यावेळी पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संघटक चेतन कांबळे यांनीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उध्दव ठाकरे यांनी आता जालन्यात लाखे पाटील आपल्याकडे आले आहेत, त्यामुळे आपण छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरील दावा सोडला आहे, असे वक्तव्य केले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे क्षणभर अवाक झाले. पण, उद्धव ठाकरे हे चेष्टा करत आहेत. हे लक्षात येताच सर्वं जण खळखळून हसले आणि खैरेंनीही सुटकेचा निश्वास सोडला.

– सुनील कच्छवे

Back to top button