केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे बांदेश्वराला साकडे | पुढारी

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे बांदेश्वराला साकडे

पणजी : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी (दि. १४ मार्च) रोजी सकाळी बांदा येथील स्वयंभू श्री. बांदेश्वराचे दर्शन घेतले. त्यांना भाजपतर्फे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी श्री. बांदेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि पुन्हा निवडून येण्यासाठी साकडे घातले.

संबंधित बातम्या 

यावेळी त्यांच्यासमवेत उत्तर गोवा भाजपचे अध्यक्ष महानंद असनोडकर, सरचिटणीस सुशांत मांजरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सभापती शितल राऊळ, माजी प्रदेश कार्यकारणी सदस्य श्यामकांत काणेकर, बांदा मंडल महिला तालुकाध्यक्ष रूपाली शिरसाट, बांदा महिला शहराध्यक्ष अवंती पंडित, शहराध्यक्ष बाबा काणेकर, स्पंदन फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धेश महाजन, देवस्थान कमिटी उपाध्यक्ष राजा सावंत, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा सावंत, मंगल मयेकर, तोरसे माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, पेडणे तालुका सोसायटीचे संचालक उमेश गाड, तोरसे माजी सरपंच प्रार्थना मोटे, बांदा माजी सरपंच दीपक सावंत, रोटरॅक्ट युथ क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, शैलेश केसरकर, गुरुदास कल्याणकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. बांदेश्वरावर विशेष श्रद्धा

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची श्री. बांदेश्वरावर विशेष श्रद्धा आहे. मागील लोकसभा निवडणूक तसेच मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी बांदेश्वराचे दर्शन घेऊन नवसफेड केली होती. श्रीपाद नाईक हे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होवोत, असे गाऱ्हाणे श्री. बांदेश्वराला घालण्यात आले. यावेळी शामकांत काणेकर यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कार्याची माहिती दिली.

Back to top button