छत्रपती संभाजीनगर : दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरूणाचा दगडाने डोळा फोडला; सात जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरूणाचा दगडाने डोळा फोडला; सात जणांवर गुन्हा दाखल

गंगापूर; पुढारी वृत्तसेवा : दारू पिण्यास पैसे का दिले नाही, म्हणून तरूणाला जातिवाचक शिवीगाळ करीत बेदम मारहाण करून त्याचा डोळा फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना गंगापूरमध्ये उघडकीस आली. संदीप अशोक तुपे (वय ३६, रा.मालुंजा खु.) असे जखमी तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.४) ॲट्रॉसिटीसह गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गंगापूर तालुक्यातील मालुंजा या गावात शनिवारी (दि.२) रात्री पावनेनऊच्या सुमारास घडली. जखमी तरूणावर जालना येथील डोळ्याच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संदीप तुपे हा तरूण शनिवारी रात्री गावातील कमानीजवळ उभा होता. यावेळी गावातील सात तरूणांनी गावातील कमानीजवळ जात संदीपकडे दारु पिण्यासाठी शंभर रुपये मागितले. संदीपने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी त्या जणांनी संदीपला बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच विष्णू बरबडे या तरूणाने संदीपला दगड्याने डोळ्याजवळ मारल्याने त्याचा डोळा निकामा झाला. स्थानिक नागरिकांनी संदीपला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला जालना येथील नेत्र रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी डोळा निकामी झाल्याचे सांगुन सर्जरी करण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी संदीप तुपे याचे वडील अशोक तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विष्णू आंबादास बरबडे, वाल्मिक अशोक पवार, पवन अशोक चौधरी, श्रीकांत अशोक चौधरी, पंकज बाबासाहेब कवडे, माणिक साहेबराव मनाळ, चेतन काका वाघचौरे ( सर्व रा. मांलुंजा खु.) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button