परभणी : सेलू येथे कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी | पुढारी

परभणी : सेलू येथे कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी

सेलू; पुढारी वृत्तसेवा: शहरातील गुलमोहर कॉलनी येथे शेख सुफियान शेख नाजेम तांबटकरी (वय ६) हा खेळत असताना मोकाट कुत्र्याने त्याच्या शरीरावर हल्ला केला. त्याच्या शरीरावर चार ते पाच ठिकाणी चावा घेऊन जखमी केले. ही घटना रविवारी घडली. नागरिकांनी तत्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे हलविले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय परभणी येथे दाखल केले.

कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे लहान मुले व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री घरी येणारे, शाळा, क्लासेसचे विद्यार्थी व पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांच्या मागे कुत्रे धावतात. दुचाकीस्वारांच्या पाठी मागे लागतात. याबाबत गुलमोहर कॉलनी येथील नागरिकांनी मुख्याधिकारी देविदास जाधव यांची भेट घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

यावेळी अब्दुल मजीद बागवान, शफिख अली खान, नुरमोहंमद ईशानी, रहीमखान पठाण, निसार पठाण, शेख कौसरभाई, सत्तार भाई बागवान, अकबर खान पठाण, गौस भाई तांबटकरी, कदीर भाई बागवान, रहीम भाई टेलर, गौस भाई अन्सारी, हकीम कादरी, सय्यद जावेद, शेख इजहार, शेख निहाल, मौजम सर आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button