सेलु तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याची होळी | पुढारी

सेलु तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

सेलू; पुढारी वृत्तसेवा : पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याने त्‍याच्या निषेधार्थ सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज (दि. १७) सकाळी ११ वाजता सेलू तहसील कार्यालयासमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली.

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिवीगाळ करून दुसऱ्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत हल्ला चढविला होता. या घटनेचा पत्रकार संघटनांनी आज निषेध केला. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, तहसीलदार सेलु यांच्यामार्फत एका लेखी निवेदन देण्यात आले आहे.

यासाठी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचीव मोहसिन शेख, नारायण पाटील, कांचन कोरडे, अबरार बेग, मोहमद ईलियास, रामेश्वर बहीरट, निशिकांत रोडगे, राहुल खपले, निसार पठाण, विठ्ठल राऊत, नीरज लोया, संतोष शिंदे, पठान अकबर, कुरेशी जावेद यांनी पुढाकार घेतला होता.

Back to top button