पुणे ; पुढारी वृत्तसेवा : वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. हवालदार संभाजी रघुनाथ गायकवाड, पोलीस नाईक महेश गंगाराम धोत्रे, पोलीस शिपाई विशाल तानाजी कदम (नेमणूक वारजे माळवाडी पोलिस ठाणे) अशी निलंबित झालेल्या कर्मचार्यांची नावे आहेत.
बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने पोलिस ठाण्यातून पळ काढला होता. या घटनेला जबाबदार धरत कर्तव्याच्या वेळी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी तीन पोलीस निलंबित केले आहे.
चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल झाली हाेती. पोलिसांनी शुक्रवारी आराेपीला अटक केली हाेती. मात्र आराेपीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातून शनिवारी (दि. १८) सकाळ सहा वाजता पळ काढला होता.
आरोपी फरार झाल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी रविवारी त्याला कर्वेनगर परिसरातून पकडले. तो येथील एका दारु गुत्त्यावर मिळून आला होता.
या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने फिर्याद दिली होती.
आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर राहतो.
त्याने पैशांचे आमिष दाखवून बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी बालिकेच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली हाेती.
वारजे पोलिसांनी तत्काळ या आरोपीला शुक्रवारी अटक केली होती.
त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र यानंतर आरोपीने पोलिस ठाण्यातून पळ काढला होता.
इतक्या गंभीर गुन्हयातील आरोपी पळून गेल्याने वारजे पोलिस टीकेचे धनी झाले होते.
हेही वाचलं का?