

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग आंधानेर फाटा बायपासवर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण ठार झाले आहेत. ही घटना दि. १० रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
संजय (गोट्या) सखाराम माळवे (वय २६, रा. सातकुंड, ता. कन्नड) हा आपल्या दुचाकी वरुन कन्नडहून सातकुंडकडे जात होता. तर सागर पांडुरंग काळे (वय ३०, रा. लोहगाव, ता. पैठण हल्ली मुक्काम जयभवानीनगर औरंगाबाद) हे आपल्या दुचाकीवरुन औरंगाबादॉकडे येत होते.
आंधानेर येथील राष्ट्रीय महामार्ग बायपासवर दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात हे दोघेही ठार झाले आहे. औरंगाबाद येथील सागर पांडुरंग काळे यांचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.
सागर हा एका कन्स्ट्रक्शन कंपनीत सुपरवायजर म्हणून नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई पत्नी आणि एक छोटी बहीण असा परिवार आहे.
पाहा व्हिडिओ- चक्क विस हजार पोस्ट तिकिटांचा संग्रह आहे या पुणेकराकडे…