औरंगाबाद : नराधम चुलत्याचा चिमुकलीवर अत्याचार | पुढारी

औरंगाबाद : नराधम चुलत्याचा चिमुकलीवर अत्याचार

पाचोड, पुढारी वृत्तसेवा : किराणा दुकानात गोळ्या बिस्कीटे आणायला गेलेल्या सहा वर्षीय चिमुकलीवर चुलत्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि.२१) संध्याकाळी उघडकीस आली. यानंतर कडेठाण तांडा येथे खळबळ उडाली आहे. बाळीराम सिताराम चव्हाण (वय २५) असे नराधम चुलत्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी चुलत्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पीडित मुलगी आईकडून पैसे घेत गोळ्या बिस्कीटे आणण्यासाठी चुलत्याच्या किराणा दुकाणात गेली होती. तेव्हा नराधम चुलत्याने कोणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. ज्या वेळी ही सर्व घटना घडली तेव्हा आरोपीच्या घरी कोणी नव्हते. सर्व जण शेतात गेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, पीडित चिमुकली रडत आईकडे आली तेव्हा हा सर्व गंभीर प्रकार समोर आला. आईने तिला विश्वासत घेऊन विचारपूस केली असता तेव्हा तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आई-वडिलांनी गुरुवारी (दि.२२) पाचोड पोलीस ठाणे गाठून सहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती दिली. यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखत पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. चिमुकलीचे शासकीय ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पाचोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल हे करीत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button