छत्रपती शिवाजी पार्क पेक्षा बीकेसी मैदान मोठे : शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Video) | पुढारी

छत्रपती शिवाजी पार्क पेक्षा बीकेसी मैदान मोठे : शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Video)

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वाद न्यायालयाच्या दारापर्यंत गेला होता. शुक्रवारी (दि.२३) या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेत न्यायालयाने शिंदे गटाला बाजुला करत ठाकरे गटाला मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. शिंदे गटाचे मस्य व बंदरे विकास मंत्री दादा भुसे माध्यमांशी बोलताना म्‍हणाले की, न्यायालाचा निर्णय आपणास मान्य आहे. माझं व्यक्तीगत मत आहे की आपण सांगताय त्याप्रमाणे निर्णय झालेला असेल तर छत्रपती शिवाजी पार्क या मैदानापेक्षा बीकेसी मैदान माेठे आहे आणि  शिवसेनेचा मेळावा कदाचित या मैदानावर अपुरा पडला असता.

पुढे बोलताना दादा भुसे म्‍हणाले, शिवसैनिक आपल्या पद्धतीने काम करत आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील, ज्या मैदानावर मेळावा होईल तो भव्य दिव्य होईल. असे दादा भुसे म्‍हणाले.

हेही वाचा 

चंद्रपूर : जन्मदात्याचा पोटच्या मुलीवर अत्याचार 

डोंबिवलीत भरदुपारी दोन महिलांना ३ लाखांना लूटले 

पुणे : चोरी करण्यासाठी त्याने घेतली ऑनलाईन तिजोरी विकत

Back to top button