Anti India Activities In Canada : द्वेषपुर्ण वातवरणामुळे कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने केले सावध | पुढारी

Anti India Activities In Canada : द्वेषपुर्ण वातवरणामुळे कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने केले सावध

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : हेट क्राईममुळे कॅनडाला (Anti India Activities In Canada)  जाणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना भारताने सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कॅनडात भारतविरोधी कारवायांमध्ये वाढ झाल्याने भारताने प्रवास करणाऱ्यांसाठी सुचना दिल्या आहेत. सरकारने म्हटले आहे की परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडात घडणाऱ्या द्वेषपूर्ण गुन्हे प्रकरणाबाबत आणि भारतविरोधी कारवायांबाबत कॅनडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडून या गुन्ह्यांबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पण, आतापर्यंत घडलेल्या अशा गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्यांना लोकांना कॅनडाने अद्याप कोणतीही शिक्षा केलेली नाही,” असे देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, वरील घटना लक्षात घेता, भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी कॅनडात जाण्यासाठी प्रवास करताना आणि तेथे राहिलेल्यांनी सावधगिरी बाळगावी. सरकारने भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ओटावा येथ असलेल्या भारतीय मिशन येथे तसेच टोरंटो आणि वेंकोवर येथे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे भारतीय उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना कॅनडातील भारतीय नागरिकांशी संपर्कात राहणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल. (Anti India Activities In Canada)

काही दिवसांपूर्वी कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांनी टोरंटो येथील एका प्रमुख हिंदू मंदिरावर भारतविरोधी भित्तिचित्रे तयार करून विद्रुपीकरण केल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेला द्वेषपूर्ण गुन्हा ठरवत भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांना आरोपींविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले होते. टोरंटोच्या BAPS स्वामीनारायण मंदिरात ही घटना कधी घडली, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण टोरंटोमधील भारतीय उच्चायुक्तांनी बुधवारी ट्विट केले की, आम्ही टोरंटोमधील BAPS स्वामीनारायण मंदिराच्या भारतविरोधी भित्तिचित्रांसह केलेल्या अपमानाचा तीव्र निषेध करतो. कॅनडाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करून आरोपींविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. (Anti India Activities In Canada)


अधिक वाचा :

Back to top button