लातूर : गुंगीच्या गोळ्यांसह युवकाला अटक | पुढारी

लातूर : गुंगीच्या गोळ्यांसह युवकाला अटक

लातूर : विक्री करण्याच्या उद्देशाने गुंगीच्या गोळ्या बाळगणार्‍या एका युवकास गांधी चौक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 350 गोळ्या ( 35 स्ट्रीप), मोबाईल व रोख रक्कम असा 12 हजार 715 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सुमित संतोष कासले (वय 22) असे त्याचे नाव असून तो मूळ चाकूर तालुक्यातील दापक्याळचा रहिवासी असून सध्या तो विवेकानंद चौक परिसरातील नाथ नगरात राहतो. सुमित कासले याला येथील राज्य परिक्षा मंडळाच्या विभागीय कार्यालयाजवळील एका पुलावर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे 350 गोळ्या आढळल्या. याशिवाय 9 हजार रुपयांचा मोबाईल, 1 हजार 150 रोख असा मुद्देमाल त्याच्याकडून पोलिसांनी ताब्यात घेतला. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Back to top button