एकीकरण समितीच्या उमेदवारांनी घेतली डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट | पुढारी

एकीकरण समितीच्या उमेदवारांनी घेतली डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव पाटील आणि कारवार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्यासह एकीकण समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही उमेदवारांनी डॉ. जाधव यांचे आशीर्वाद घेतले.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव पाटील आणि कारवार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निरंजन सरदेसाई समितीच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. जाधव यांचे आशीर्वाद पाठीशी असावेत, यासाठी दोन्ही उमेदवारांसह शिष्टमंडळाने डॉ. जाधव यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमाभागातील नेतृत्व संसदेत जावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचे चर्चेवेळी सांगण्यात आले.

शिष्टमंडळात माजी आमदार मनोहर किणेकर, गोपाळराव देसाई, आबासाहेब दळवी, बाळासाहेब शेलार, मुकुंद पाटील, रणजित पाटील, गुरुराज सरदेसाई, विकास कलघटगी, मंगेश देसाई यांचा सहभाग होता.

Back to top button