निम्म्या कोल्हापुरात गुरुवार, शुक्रवारी पाणीपुरवठा बंद | पुढारी

निम्म्या कोल्हापुरात गुरुवार, शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आयटीआय वसतिगृहाजवळ 1100 मि. मी. व्यासाची सिमेंट काँक्रीटची जलवाहिनी काढून त्याठिकाणी लोखंडी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यानंतर क्रॉस कनेक्शन केले जाणार आहे. त्यासाठी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवला जाणार आहे. परिणामी, गुरुवारी व शुक्रवारी (दि. 25 व 26) शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह निम्म्या कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी (दि. 27) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

शहरातील ए, बी वॉर्डमधील पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या कळंबा जेल समोरील परिसर, वसंत विश्वास पार्क, एल.आय.सी. कॉलनी, अमरनाथ मंदिर परिसर, बाबुराव साळोखे पार्क, तपोवन, म्हाडा कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स, नाळे कॉलनी, बापूरामनगर, प्रथमेशनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, बुद्धिहाळकर नगर, वाल्मिकी आंबेडकरनगर, हस्तीनापूर नगरी, शांती उद्यान परिसर, शिवगंगा कॉलनी, श्रीराम कॉलनी, साई कॉलनी, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद, एन. टी. सरनाईकनगर, योगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, चव्हाण कॉलनी, मोहिते कॉलनी, गणपतीनगर, पार्वती पार्क, भोसले कॉम्प्लेक्स, मल्हार रेसिडेन्सी, शिवप्रभूनगर, मोरे-मानेनगर, राणे कॉलनी, आक्काताई मानेनगर, महादेव नगरी, जनाईदत्तनगर, विद्या विहार कॉलनी, जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर स्टँड परिसर, नवीन मोरे कॉलनी, जोशीनगर, विजयनगर, शहाजी वसाहत, संभाजीनगर, कोल्हापूर सॉ मिल, गंजीमाळ, रामानंदनगर, जरगनगर, रेणुकानगर, आर. के. नगर, गणेश कॉलनी, हनुमाननगर, जोतिर्लिंग कॉलनी, रायगड कॉलनी, हॉकी स्टेडियम, बालाजी पार्क, यशवंत कमल पार्क, जाधवनगर, खंडोबा मंदिर परिसर, भारतनगर, सुभाषनगर, वाय. पी. पोवारनगर, वारे वसाहत, शाहू बँक परिसर, राम गल्ली, भारत डेअरी परिसर, मंगेशकरनगर, बेलबाग, मंडलिक वसाहत, पाटाकडील तालीम, बजापराव तालीम, जासुद गल्ली, कोळेकर तिकटी, पोवार गल्ली, वेताळ माळ तालीम, 8 नंबर शाळा, फिरंगाई गल्ली, टिंबर मार्केट, कोंडेकर गल्ली, सरदार तालीम परिसर, शहाजी वसाहत, साळोखेनगर टाकीअंतर्गत कणेरकरनगर, आपटेनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, बीडी कॉलनी बोंद्रेनगर, राजोपाध्येनगर, साने गुरुजी वसाहत, हिंदू कॉलनी, सुलोचना पार्क, राधानगरी रोड, क्रशर चौक, मोहिते पार्क, केदार पार्क, देशमुख शाळा, शिवाली पार्क आदी भागांत दैनंदिन पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.

Back to top button