MLA Prakash Awade | हातकणंगलेत आता पंचरंगी लढत! आमदार प्रकाश आवाडे निवडणूक रिंगणात | पुढारी

MLA Prakash Awade | हातकणंगलेत आता पंचरंगी लढत! आमदार प्रकाश आवाडे निवडणूक रिंगणात

पुढारी ऑनलाईन डेस्क : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षाच्यावतीने आमदार प्रकाश आवाडे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपण निवडणूक लढवीत असल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता पंचरंगी लढत होणार आहे. (MLA Prakash Awade)

हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील- सरुडकर, शिंदे गटाकडून धैर्यशील माने तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि बहुजन वंचित आघाडीकडून डी. सी. पाटील निवडणूक लढवत आहेत. आता ताराराणी पक्षाच्यावतीने आमदार प्रकाश आवाडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मैदानातील चुरस वाढणार आहे. (Hatkanangale Lok Sabha seat)

आवाडे यांनी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केल्याने महायुतीपुढील आव्हाने वाढण्याची चिन्हे आहेत. नुकतीच कोल्हापुरात आवाडे यांच्या निवासस्थानी ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, आवाडे समर्थक व लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली होती. यावेळी आ. प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, स्वप्निल आवाडे यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. बंद खोलीत यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज आवाडे (MLA Prakash Awade) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतरावर राहत ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. तसेच हातकणंगलेत वंचित बहुजन आघाडीचीही चांगली ताकद आहे. त्यांनीही येथे उमेदवार दिल्याने हातकणंगलेत पंचरंगी लढतीचा सामना रंगणार आहे.

 हे ही वाचा :

Back to top button