Kolhapur News: हातकणंगले – कोरोची रोडवर एकाचा खून | पुढारी

Kolhapur News: हातकणंगले - कोरोची रोडवर एकाचा खून

पुढारी ऑनलाईन: कोल्हापूरतील हातकणंगले नजीक रघु जानकी हॉलच्या मागे एकाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासानुसार संबंधित वयक्तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृताची ओळख पटली असून, त्याचे नाव भारत पांडुरंग यशाळ असे आहे. मृत इचलकरंजी येथील रेणुका नगर झोपडपट्टीमधील असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे. (Kolhapur News)

मृत व्यक्ती भारत पांडूरंग येशाळ (वय अंदाजे ४५ वर्ष रा. रेणूका झोपडपट्टी, इचलकरंजी) यांचा धारधार शस्त्राने खून करणेत आल्याचे रविवारी पहाटे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले आणि शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी डॉगस्कॉड ,फॉरेन्सीक टीम आणि समर्थ रूग्णवाहिकेचे स्वप्नील नरूटे दाखल झाले आहेत. घटनास्थळाचा पोलीसानी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रूग्णालय मध्ये हलविणेत आला आहे.

मयत भरत येशाळ हा ट्रक मेकॅनिकल असलेने त्याला रात्री १२ वा च्या चे सूमारास ‘ट्रक बंद पडला असून दुरुस्तीसाठी या’ असा फोन आला. यानंतर मयत व्यक्ति घरातून गेल्याचे त्यांच्या नातेवाईकानी पोलिसांना माहिती देताना सांगितले. त्याला रात्री फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत असून, अज्ञाताविरोधी गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करणेची प्रक्रिया सुरू आहे.

Back to top button