काँग्रेसने जिवंत ठेवलेल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजपचे : आमदार सतेज पाटील | पुढारी

काँग्रेसने जिवंत ठेवलेल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजपचे : आमदार सतेज पाटील

हातकणंगले; पुढारी वृतसेवा : गेल्या नऊ वर्षामध्ये महागाईच्या भस्मसूरात सर्वसामान्य जनता होरपळली आहे. केवळ कर्जमाफीच्या वल्गना भाजप करीत आहे. परंतु नऊ वर्षात बारा लाख कोटीचा फायदा कोणाचा केला असा सवाल करून काँग्रेसच्या काळात जीवंत ठेवलेल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजप करिता असल्याचा घणाघात आमदार बंटी उर्फ सतेज पाटील यांनी केला.

ते हातकणंगले येथे जनसंवाद पदयात्रेच्या सांगता सभेमध्ये बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील हेरले येथून संवाद यात्रेला सुरवात झाली. हातकणंगले येथे बैलगाडीतून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व आमदार राजू बाबा आवळे येताच त्यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव केला. यात्रा नेहरू चौकात येताच यात्रेचे सभेत रूपांतर झाले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले जनसंवादयात्रेचा संकल्प लोकाचेप्रश्न, अडचणी समजावून घेवून अडचणी सोडविण्यासाठी अग्रभागी राहणे हाच आहे. भाजपने अच्छे दिनच्या नावाखाली सत्ता स्थापन केली मात्र जनतेला अच्छे दिन आलेच नाही मात्र भाजपाने स्वतःचा फायदा करून घेतला. वाढलेली महागाई मुळे जनता होरपळत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. परिणामी सर्वसामान्याना काँग्रेसचे राज्य पून्हा लोकाना हवे आहे. कॉग्रेसने सर्वसामान्य लोंकाना केन्द्रस्थानी ठेवून कारभार करून देश विकसीत केला, मात्र भाजपनी स्वतःचा पक्ष बळकट करुन संविधान बंद करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे.

आमदार राजू बाबा आवळे म्हणाले काँग्रेसमुळे भारत देश एकसंघ राहीला, विरोधकांनी ९ वर्षात देशातील लोकाना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे, व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो मात्र देशात व्यक्ती क्रेदींत काम सुरू आहे. जाती जातीमध्ये भाजपाने तेढ निर्माण केल्याने देशाची परिस्थिती फार बिकट आहे,हूकूमशाहीकडे देश झूकत आहे . मात्र काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी देश वाचविण्यासाठी जीवाच रान करीत आहेत.

यावेळी स्वागत डॉ . अभिजित इंगवले व प्रास्तावीक नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांनी केले .आमदार जयंत पाटील, काँग्रेस कमीटीचे तालूका अध्यक्ष भगवान जाधव ,नूर महमंद मुजावर सर्जेराव माने ,यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास माजी जि.प. सदस्याअर्चना जानवेकर , उत्तम सावंत , बाजीराव सातपूते , शकील अत्तार , , बाजीराव सातपूते, सलीम जमादार , पैलवान राहूल माने ,माजी जि, प सदस्या विजया पाटील, डॉ विजय गोरड, अमर पाटील,

Back to top button