कोल्हापूर : कुरुंदवाड सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी रविराज फडणीस यांची नियुक्ती | Kurundwad API Fadnis | पुढारी

कोल्हापूर : कुरुंदवाड सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी रविराज फडणीस यांची नियुक्ती | Kurundwad API Fadnis

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी रविराज अरुण फडणीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. ६) पदभार स्वीकारला. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांची पुणे ग्रामीणला बदली झाल्याने यापदावर सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांची नियुक्ती झाली.

दरम्यान मिरज गांधीनगर पोलीस ठाण्यातून त्यांच्या जिल्हा बदलीने कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस हे गेली 12 वर्षे पोलीस दलात अधिकारी पदावर सेवा बजावत आहेत. 2011-12 या वर्षी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून ते सेवेत रुजू झाले. त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली येथे सेवा बजावली. त्यानंतर 2018 साली कोल्हापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदी त्यांची पदोन्नती झाली. 2019 साली सांगली जिल्ह्यात त्यांची बदली झाली.

केंद्र सरकारच्या उत्तम जीवन रक्षा पदकाने सन्मान

मिरज गांधीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या एमआयडीसीतील मिलिंद केमिकल कारखान्याला आग लागली होती. या आगीत अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारने दखल घेत 26 जानेवारी 2023 रोजी केंद्र सरकारचा उत्तम जीवन रक्षा पदक महाराष्ट्र राज्यातून एकमेव पदक त्यांना बहाल करून सन्मान केला आहे.

तक्रारींची दखल तात्काळ घेतली जाईल : एपीआय फडणीस

पत्रकारांशी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस म्हणाले, कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था राखली जाईल. स्थानिक पातळीवरील वाहतूक कोंडी व अन्य समस्या पोलीस व स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिक यांच्या सहकार्यातून सोडवल्या जातील. तसेच नागरिकांच्या तक्रारी, महिला छेडछाड, अन्य तक्रार तसेच कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याबाबत ही तक्रार नागरिकांनी थेट आपल्याकडे करावी. तक्रारींची दखल तात्काळ घेतली जाईल असे  सांगितले.

Back to top button