JEE Main Result 2023 : सेंट्रिंग कामगाराचा मुलगा जेईई परीक्षेत उत्तीर्ण | पुढारी

JEE Main Result 2023 : सेंट्रिंग कामगाराचा मुलगा जेईई परीक्षेत उत्तीर्ण

कसबा बीड; पुढारी वृत्तसेवा : कोगे (ता. करवीर) येथील ओंकार भगवान साठे-पाटील हा जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे अपंगत्वावर मात करून अलौकिक कामगिरीच्या जोरावर त्याने या परीक्षेत 360 पैकी 50 गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे.

साठे-पाटील यांची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची आहे. अल्पभूधारक वडील सेंट्रिंग काम करतात. तर आई घरकाम करून दुसर्‍याच्या शेतावर राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. विशेष म्हणजे त्याच्या आई-वडिलांचे शिक्षण अवघ्या चौथीपर्यंत झाले आहे.

जन्मतः डाव्या हाताने अपंग असलेल्या ओंकारला अगदी बालपणापासून शिक्षणाची आवड होती. त्याचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर, कोगे येथे झाले. तर 6 वी ते 10 वी नवोदय विद्यालय, कागल येथे झाले आहे. सध्या तो जवाहार नवोदय विद्यालय, सीतापूर बंदी, राजस्थान येथे शिक्षण घेत आहे. नुकत्याच झालेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आहे. मुलाचे यश पाहून आई-वडिलांना अत्यानंद झाला होता. ओंकारच्या विशेष कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा :

Back to top button