Majhi Vasundhara : माझी वसुंधरामध्ये धरणगुत्ती ग्रामपंचायत राज्यात दुसरी | पुढारी

Majhi Vasundhara : माझी वसुंधरामध्ये धरणगुत्ती ग्रामपंचायत राज्यात दुसरी

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत ५ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या गटामध्ये राज्यस्तरावर ग्रामपंचायत धरणगुत्ती ता. शिरोळ ग्रामपंचायतीच राज्यात द्वितीय क्रमांक आला. हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आला. (Majhi Vasundhara)

माझी वसुंधरा अभियान ३० अंतर्गत भुमि, जल, वायु, आकाश आणि अग्नी या निसर्गाशी संबंधीत पंचतत्त्वांवर आधारीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. या स्पर्धेमध्ये सहभागी होवून पर्यावरणाशी संबंधीत प्रभावी अंमलबजावणी विहीत केलेल्या उद्दिष्ट पुर्तता करणाऱ्या संस्थांना दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन म्हणजे ५ जुन रोजी राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते. (Majhi Vasundhara Dharanagutti Gram Panchayat)

माझी वसुंधरा अभियानच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भुमि, जल, वायु, आकाश आणि अग्नी या पंचतत्त्वावर आधारीत विहीत केलेल्या उद्दिष्टांची पुर्तता करण्यासाठी प्रत्येक नगरपरिषद व ग्रामपंचायतींना दर पंधरवड्याची उद्दिष्ट ठरवून देण्यात येत असतात. सदरची उद्दिष्टे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर आंमलबजावणीचा आढावा शासनाकडून घेतला जातो. घन कचरा व्यवस्थापक, सांडपाणी व्यवस्थापन पर्यावरण सुरक्षा या दृष्टीने ग्रामपंचायत धरणगुत्तीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले होते. या उपक्रमांचे गुणात्मक परिक्षण करून ग्रामपंचायत धरणगुत्तीस सदरचा पुरस्कार देण्यात आला आहे. सदरच्या पुरस्काराकरीता ग्रामपंचायत धरणगुत्तीस पर्यावरण हिताच्या दृष्टीने शासन रक्कम रू. १ कोटी २५ लाख देणार आहे.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विजया कांबळे, उपसरपंच जीवन रजपूत, सदस्य शेखर पाटील, भालचंद्र लंगरे व ग्रामविकास अधिकारी श्री. चंद्रकांत केंबळे व अन्य सदस्य उपस्थित होते.

Back to top button