कोल्‍हापूर : सोहाळे जंगल परिसरात गवा मृतावस्थेत आढळला | पुढारी

कोल्‍हापूर : सोहाळे जंगल परिसरात गवा मृतावस्थेत आढळला

सोहाळे : सचिन कळेकर आजरा तालुक्यातील सोहाळे जंगल परिसरात आज (शनिवार) गवा मृतावस्थेत आढळला. ग्रामस्थांनी मृतावस्थेतील गव्याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाकडून घटनास्थळीची पाहणी व शवविच्छेदन अहवालानंतरच गव्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे? हे स्पष्ट होणार आहे.

सोहाळे गावाजवळील वनविभागाच्या जंगल परिसरात गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. या परिसरात यापुर्वी गव्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्‍यान आज सकाळी गावाजवळील पाटील यांच्या बागेजवळील वनविभागाच्या जंगल परिसरात गवा मृतावस्थेत असल्याचे काही ग्रामस्थांना निदर्शनास आले. तातडीने याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली.

सदरचा गवा शुक्रवारी दिवसभर त्याच परिसरात घुटमळत होता असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. तो आजारी असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून, रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते. वनविभागाची पाहणी व शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच गव्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे? हे स्पष्ट होणार आहे. मृत गव्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button