कोल्हापूर शहरात उद्या पाणीपुरवठा बंद | पुढारी

कोल्हापूर शहरात उद्या पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बालिंगा उपसा केंद्राला विद्युतपुरवठा करणार्‍या उच्चदाब वाहिनीचे तांत्रिक काम रविवारी (दि. 19) करण्यात येणार असल्याने रविवारी बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या कोल्हापूर शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डांसह उपनगरांतील पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार आहे.

शहरातील ए, बी वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरांतील फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठेचा काही भाग, दुधाळी, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब—ह्मपुरी, बुधवार पेठ, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, अंबाबाई मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी 5, 6, 7, 8 वी गल्ली, कुंभार गल्ली, बागल चौक आदी भागांत पाणीपुरवठा होणार नाही.

Back to top button