अब्दुललाट येथे मगरींचा वावर ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अब्दुललाट येथे मगरींचा वावर ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अब्दुललाट ; पुढारी वृत्तसेवा : अब्दुललाट (ता. शिरोळ)  येथे मगरींचा वावर वाढल्याने याठिकाणी भीतीचे वातावरण पसरले आहे. अब्दुललाट येथे मगरींचा वावर वाढल्‍याने ४०० एकर शेतीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा बंद ठेवावे लागत आहे.

अब्दुललाट येथील पंचगंगा नदी पात्रामध्ये तसेच नदी काठीअनेक शेतकऱ्यांच्या नजरेस सहजरित्या मगर दिसते.

नदीकाठी मगरींचा वावर वाढल्याने या भागात शेतीकामासाठी जाणारे शेतकरी दहशतीखाली आहेत. या ठिकाणी अब्दुललाट बागायतदार पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल आहे.

येथील कर्मचारी मगरींच्या भीतीने काम करण्यास नकार देत असल्याने ४०० एकर शेतीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा बंद ठेवावे लागत आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मगरींच्या वावरामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये वा जीवित हानी होऊ नये यासाठी वेळीच वनविभागाने लक्ष घालून मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news