संभाजीराजेंचे माझ्यावर कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप : विनय कोरे | पुढारी

संभाजीराजेंचे माझ्यावर कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप : विनय कोरे

वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत संभाजीराजे यांनी माझ्यावर जे आरोप केले, ते कुणाच्या तरी सांगण्यावरून गैरसमजातून केले आहेत. माझ्या मते संभाजीराजेंसारख्या जबाबदार व्यक्तीने आरोप करणे योग्य नाही, असे मत आ. डॉ. विनय कोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शुक्रवारची बैठक तिक्रमणाला संरक्षण देण्यासाठी घेतली होती हे कशावरून ठरवले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शनिवारी संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुक पेजवर विशाळगडावरील अतिक्रमणास स्थानिक लोकप्रतिनिधी मतांसाठी संरक्षण देत असल्याचा आरोप आ. कोरे यांचे नाव न घेता केला होता.

आ. कोरे म्हणाले, कोल्हापूरमधील बैठक विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी किंवा त्यास कायम संरक्षण देण्यासाठी नव्हती. तरीसुद्धा संभाजीराजेंनी माझ्यावर असा का आरोप केला हेच कळत नाही.

विशाळगडच्या द़ृष्टीने आराखडा व पॉलिसी करणे शक्य आहे, याचा विचार करण्यासाठी ही बैठक होती. पुढील बैठक 19 जानेवारीला घेऊन सर्वांच्या भावना लक्षात घेतल्या जातील. विशाळगडच्या विकासाबाबतीत कायदेशीर बाबींचा आढावा घेऊन स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन समन्वय साधण्याचा माझा प्रयत्न यापुढेही राहील.

Back to top button