कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कोल्हापुरातील खोलीचे होणार स्मारक - पुढारी

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कोल्हापुरातील खोलीचे होणार स्मारक

स्नेहा मांगुरकर ; पुढारी ऑनलाईन : कर्मवीर भाऊराव पाटील कोल्हापूरमध्ये ज्या खोलीत राहत होते, त्या खोलीत स्मारक साकारणार आहे. येथील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये ही खोली आहे. कर्मवीर या खोलीत १९०७ ते १९०८ या कालावधीत वास्तव्यास होते.

दिगंबर जैन बोर्डिंगच्या जुन्या इमारतीमध्ये ही खोली आहे. या खोलीला त्या काळातील रुप देऊन कर्मवीरांच्या काही जुने फोटो आणि इतर आठवणींचे जतन येथे केले जाणार आहे. जैन बोर्डिंग व्यवस्थापनाने पुढारी ऑनलाईनशी बोलताना ही माहिती दिली.

भाऊराव पाटील यांची २२ सप्टेंबरला जयंती साजरी केली जाते. त्या निमित्ताने पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

दिगंबर जैन बोर्डिंग येथील खोली क्रमांक सात मधली भाऊराव पाटील मार्च १९०७ ते एप्रिल १९०८ या दरम्यान वास्तव्यास होते. या खोलीचे स्मारक करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संचालक पदाधिकारी आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी दिली.

कर्मवीर भाऊराव यांच्या वापरातील वस्तू एकत्र करण्यात येणार

कर्मवीर पाटील यांच्या खोलीमध्ये त्यांचे जुने फोटो, त्यांच्या वापरातील वस्तू आणि त्यांच्या आ ठवणी प्रतित होतील ,अशा सर्व वस्तूंची मांडणी तिथे केली जाणार आहे. यासाठी रयत शिक्षण संस्थेमधूनही भाऊराव पाटील यांच्या वापरातील काही वस्तू आणल्या जाणार आहेत, अशी माहिती तेथील आजी-माजी विद्यार्थ्यांनी दिली.

यावर सध्या काम सुरू असून यामध्ये बोर्डिंगचे चेअरमन सुरेश रोटे, सेक्रेटरी विजयकुमार शेट्टी, व्हाईस चेअरमन सुकुमार पाटील, जॉइंट सेक्रेटरी सूर्यकांत पाटील, अधीक्षक प्राध्यापक संदीप पाटील, जॉईंट सुप्रिडेंट राकेश निल्ले ,संचालक राजकुमार चौगुले, नितीन पाटील, प्रफुल्ल चमकले, आर .जे .पाटील, रोहित पाटील, राकेश पाटील व इतर सर्व पदाधिकारी, संचालक, आजी-माजी विद्यार्थी कार्यरत आहेत.

Back to top button